पश्चिम रेल्वे विस्कळीत, विरारच्या प्लॅटफॉर्मवर शॉर्टसर्किटमुळं आग
एबीपी माझा वेब टीम | 16 Aug 2016 03:20 PM (IST)
मुंबई : ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वे मार्गावरची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. विरारच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर लोकलमधून धूर येण्यास सुरुवात झाली आहे. सिग्नल केबल बॉक्समध्ये शॉर्टसर्किट झाल्याने लोकलच्या एका डब्यातून हा धूर निघू लागला. दरम्यान या घटनेनंतर पश्चिम रेल्वे मार्गावरची वाहतूक वसई रोडपर्यंतच सुरु ठेवण्यात आली होती. मात्र, आता प्लॅटफॉर्म क्रमांत 3 वरुन वाहतूक सुरु असल्याची माहिती मिळते आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरचे बहुतांश नागरिक नालासोपारा आणि विरारचे रहिवाशी असतात. या घटनेमुळं त्यांची मोठी गैरसोय झाली आहे.