मुंबई : शिवसैनिकांमध्ये अंगार पेटवण्यासाठी शिवबंधन पाठोपाठ आता खास व्याघ्रमूठ तयार करण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुलाबा विधानसभेचे शिवसेनेचे समन्वयक कृष्णा पवळे यांच्या संकल्पनेतून वाघाची अंगठी तयार करण्यात आली आहे.


खासदार अरविंद सावंत आणि विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या हस्ते ८८ जणांना या अंगठीचं वाटप करण्यात आलं. त्यामुळे यापुढे शिवबंधनासोबतच ही अंगठीही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या हाती दिसेल.

दरम्यान, या वाघ अंगठीच्या प्रेमात सारेच शिवसैनिक पडल्यामुळे भविष्यात या अंगठीची मोठ्या प्रमाणात मागणी जोर धरेल, असा विश्वास या अंगठीची संकल्पना साकारणाऱ्या कृष्णा पवळे यांनी व्यक्त केला आहे.