मुंबई : शिवसेनेची महत्त्वाकांक्षी टॅब योजना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. स्थायी समितीत या टॅबसाठी एक कोटींचे चार्जिंग पाँईंट्स लावण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र जे टॅब दोन वर्षांपूर्वीच वाटले गेले, त्याचं चार्जिंग इतक्या उशिरा का, असा सवाल विरोधकांनी केला आहे.

 
शिवसेनेचे हे टॅब नादुरुस्त असल्याचं यापूर्वीही समोर आलं होतं. शाळेत चार्जिंग करण्याची सोय नसल्यानं विद्यार्थ्यांना बंद टॅबचा काहीच उपयोग होत नव्हता. टॅब घरी न्यायचे की शाळेतच ठेवायचे याबाबतही अद्याप संभ्रम आहे.

 

मुंबई महापालिकेने ही योजना राबवण्यासाठी 11 कोटी रुये खर्च केले, मात्र यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र आता आधीच डॅमेज असलेल्या टॅबसाठी एक कोटींचा खर्च करण्यावरुन पुन्हा एकदा सेना-मनसेत जुंपली आहे.