मुंबई : घाटकोपरमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत हत्येची प्रकार समोर आला आहे. बंटी उर्फ नितेश सावंत असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. नितेश शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे. नितेशचे काका प्रदीप सावंत माजी नगरसेवक आहेत.


रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घाटकोपरजवळील साईबाबा गार्डनजवळ हा धक्कादायक प्रकार घडला आहे. नितेश मित्रांसोबत वाढदिवसाचे सेलिब्रेशन करत होता. त्यावेळी त्याचा तेथे वाद झाला आणि या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. दरम्यान नितेशवर 7-8 जणांच्या टोळक्याने  धारदार शस्त्राने पोटावर आणि डोक्यावर वार केले आणि तिथून पळ काढला.



जखमी झालेल्या नितेशला राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. नितेशचा काही दिवसांपूर्वी त्याच्या मित्रांसोबत वाद झाला आहे. त्यांनीच ही हत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी 2 ते 3 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे.