मुंबई : "आम्हाला माहित आहे की, अमित शाह यांचा अजेंडा काय आहे, पण आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. यामध्ये कोणताही बदल होणार नाही," असं शिवसेना खासदार संजय राऊत स्पष्ट केलं आहे.

अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची दोन तास चर्चा

'संपर्क फॉर समर्थन' अभियानाअंतर्गत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेलं नसलं तरी, यादरम्यान संजय राऊत यांचं विधान महत्त्वाचं समजलं जात आहे.

"अमित शाह काल मातोश्रीवर आले होते. भाजप अध्यक्ष आणि शिवसेना प्रमुख यांच्या सुमारे पावणे दोन तास विविध विषयांवर चांगली चर्चा झाली. आपण पुन्हा भेटू, असं अमित शाह म्हणाले. याशिवाय त्या भेटीबाबात आणखी काही सांगण्यासारखं माझ्याकडे नाही.

अमित शाह-उद्धव ठाकरेंची भेट झाली, पण विधानपरिषदेत युती नाही

उद्धव ठाकरे आज संध्याकाळी पालघरमध्ये जातील, तिथे त्यांची सभाही आहे. कदाचित तिथे ते आपली मतं मांडतील. आम्हाला अमित शाहांचा अजेंडा माहित आहे. पण शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने एक प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यानुसार, आगामी सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार आहोत. त्या प्रस्तावात कोणताही बदल होणार नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

खोतकरांच्या तक्रारीमुळे दानवेंना 'मातोश्री'वर नेणं टाळलं?

"भाजप आणि शिवसेना आगामी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकत्र लढेल," असा विश्वास अमित शाह यांनी बुधवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांना भेटण्याआधी व्यक्त केला होता. दोन्ही पक्षांमधील दुरावा कमी करण्यासाठी ही भेट झाल्याची चर्चा आहे.

अमित शाहांची 'बकेट लिस्ट', राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून निशाणा

त्यानंतरही शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे आमित शाहांच्या भेटीनंतरही शिवसेना आणि भाजपचे संबंध फारशे सुधारताना दिसत नाहीत. शिवसेनेने याआधीही 2019 ची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती.

माधुरी दीक्षितला भाजपकडून राज्यसभेची ऑफर?