मुंबई: महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं आमच्याशी संपर्क साधला होता, मात्र आम्ही त्याला स्पष्ट नकार दिल्याचं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.
तसंच इतर छोट्या पक्षांना सोबत घेऊन काँग्रेस आपला स्वतंत्र उमेदवार महापौरपदाच्या शर्यतीत उतरवणार असल्याचं निरुपम यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
मुंबई पालिकेत शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येईल याची शक्यता जास्त आहे. आणि काँग्रेसला विरोधकांच्या भूमिकेत बसण्याचा कौल जनतेनं दिला आहे. त्यामुळे आम्ही शिवसेनेला मदत करणार नसल्याचं निरुपम म्हणाले.
दुसरीकडे, जी भूमिका संजय निरुपम यांनी मांडली. तीच भूमिका गुरुदास कामत यांनीही मांडली आहे. त्यामुळे या एका मुद्द्यावर का होईना पण कामत आणि निरुपम यांचं एकमत झालेलं दिसतं आहे.
कामत यांनी राहुल गांधींना एक पत्र लिहिलं आहे आणि मुंबईत शिवसेनेला साथ देऊ नये. असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आहे. गेल्या काही दिवसात मुंबई काँग्रेसमध्ये गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांची वेगवेगळ्या दिशेला तोंडं आहेत. मात्र या मुद्द्यावर त्यांचं एकमत झालं आहे.
संबंधित बातम्या:
शिवसेना-भाजप युतीसाठी मी पुढाकार घेईन: आठवले
युती होणार का? आशिष शेलार म्हणतात…
राज ठाकरेंच्या ‘सात’ची ‘साथ’ शिवसेनेला की भाजपला?
तिसरा अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, संख्याबळ 87
युतीबाबत अजून विचार केलेला नाही, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण