शिवसेनेने मुंबईत विविध ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याचे पोस्टर्स लावले आहेत. ‘चलो आयोध्या, चलो वाराणसी, देशाच्या राजकारणातील महत्त्वकांक्षी पाऊल’ असं या पोस्टर्सवर लिहिण्यात आलं आहे. या पोस्टर्सवर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांचाही फोटो झळकत आहे.
अयोध्या आणि वाराणसी दौऱ्यात शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन या पोस्टर्समधून करण्यात आलं आहे. 2019 च्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपला कोंडित पकडण्यासाठी शिवसेनेनं मोठं पाऊल टाकल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, शिवसेनेचे हे पोस्टर्स मुंबईभर लावण्यात आले आहेत. वांद्रे परिसरात तर पावला पावलावर हे पोस्टर्स झळकत आहेत.
दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उद्या वाढदिवस आहे. त्याबाबतचेही पोस्टर्स या पोस्टर्सच्या बाजूला दिसत आहेत.