मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते आणि विभागप्रमुखांची 'मातोश्री' इथं तातडीची बैठक बोलावली आहे.


शिवसेनेची मुंबई महापालिकेसाठी 227 उमेदवारांची यादी तयार आहे. या यादीतील उमेदवार निश्चित करणे आणि महाराष्ट्रभरात नेत्यांचे प्रचार दौरे आखण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

शिवसेनेची रणनीती

  • उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे एका दिवसाला दोन सभा घेणार.

  • मुंबई, ठाणे, नाशिक पुणे येथे उद्धव यांची जाहीर सभा तर आदित्य ठाकरेंचा रोड शो होणार

  • नागपूरमध्येही उद्धव ठाकरे सभा घेणार

  • उद्धव यांची शेवटची सभा ठाण्यात होणार.

  • 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे प्रचारासाठी गोव्यात जाणार.

  • याशिवाय रामदास कदम, सुभाष देसाई, अमोल कोल्हे आणि नितीन बानगुडे पाटील यांचे राज्यभरात कार्यकर्ते मेळावे होणार आहेत.


शिवसेनेचे नवे पोस्टर्स

शिवसेनेची 227 जणांची यादी तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे नवे पोस्टर्स व्हायरल करण्यात आले आहेत. युतीच्या चर्चेचं घोडं अडलेलं असतनाच शिवसेनेच्या नव्या पोस्टर्सनी नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

मुंबई आणि ठाणे पालिकेत शिवसेनाच जिंकणार अशा आषयाचे पोस्टर्स सोशल मीडियावर टाकण्यात आले आहेत. त्यामुळे युतीच्या भवितव्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्हं निर्माण झालं आहे.