आपला योग्य तो सन्मान राखला गेला, तर शिवस्मारक भूमिपूजन सोहळ्याला उपस्थिती लावू, असे संकेत उद्धव ठाकरेंनी दिले होते. त्यानंतर भाजप मंत्री चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे निमंत्रण देण्यासाठी उद्धव यांच्या घरी म्हणजेच मातोश्रीवर गेले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी हे निमंत्रण स्वीकारल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.
उद्धव ठाकरेंची नाराजी दूर, पाटील-तावडेंचं निमंत्रण स्वीकारलं
पंतप्रधानांसोबत उद्धव ठाकरे प्रत्यक्ष जलपूजन कार्यक्रमात असतीलच, शिवाय त्यांचा सर्व प्रकारचा सन्मान राखला जाईल, असं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं. ‘दिलजमाई हा शब्द तेव्हाच येतो, जेव्हा अंतर निर्माण झालेलं असतं, मात्र शिवसेना-भाजपमध्ये अंतर नाहीच’ अशी पुस्तीही पाटलांनी जोडली होती.
अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी 24 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह फक्त सहा जण जाणार आहेत. भूमीपूजन आणि जलपूजनाला समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी विद्यासागर राव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार उदयनराजे भोसले, खासदार संभाजीराजे छत्रपती जाणार आहेत.
मोदी रामापेक्षा मोठे नाहीत, घोषणाबाजीनंतर रावतेंचा संताप
गुरुवारीच पश्चिम रेल्वेवरील राम मंदिर या नव्या स्थानकाच्या उद्घाटन सोहळ्यात शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी रंगली होती. शिवसेनेकडून बाळासाहेबांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या, तर भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणाबाजी करण्यात आली.
भाषण सुरु होऊनही घोषणाबाजी न थांबल्याने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना संताप अनावर झाला. भाजप कार्यकर्त्यांकडून मोदींच्या नावाची घोषणाबाजी करण्यात येत होती. मोदी हे रामापेक्षा मोठे नाहीत, अशी टिप्पणी रावते यांनी केली. शिवाय भाजप कार्यकर्ते बोलू देत नसल्याचं सांगत रावते माईक सोडून निघून गेले.