"पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनी कोळी बांधवांच्या प्रश्नात लक्ष घालावं. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी प्रयत्न करावेत. काहीही अशक्य नाही, 'नथिंग इज इम्पॉसिबल'. माणूस पृथ्वीवरुन चंद्रावर पोहोचला, मग पृथ्वीवरील मच्छिमारांचं प्रश्न सोडवणं अवघड काय?" असं उदयनराजे म्हणाले.
मच्छिमारांचा विरोध
मच्छिमारांनी शिवस्मारकाच्या जागेला विरोध केला आहे. हा विरोध सरकारसोबतच्या दुसऱ्या बैठकीनंतरही कायम आहे. भूमिपूजनाच्या दिवशी आंदोलन करण्याचा पवित्रा मच्छिमारांनी कायम ठेवलाय.
शिवस्मारकासंदर्भात चर्चा करण्यासाठी मत्स्यविकास मंत्री महादेव जानकारांनी मच्छिमारांच्या संघटनेशी चर्चा केली. मात्र या चर्चेदरम्यान कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळं मच्छिमारांचा विरोध दूर करण्यासाठी सरकारकडे फक्त एक दिवसाचा कालावधी उरलाय.
संभाजी ब्रिगेडचाही विरोध
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित स्मारकाला संभाजी ब्रिगेडनी हरकत घेतली आहे. समुद्रातील स्मारकामुळे मच्छीमारांच्या उपजिविकेवर गदा येईल. त्याचबरोबर स्मारक समुद्रात असल्यानं बोटीने स्मारकापर्यंत जाणं लोकांना परवडेल का असे प्रश्न संभाजी ब्रिगेडनी उपस्थित केले आहेत.
संबंधित बातम्या