LIVE : अहमदनगरला राज्यातील किमान तापमानाची नोंद
एबीपी माझा वेब टीम | 23 Dec 2016 07:30 AM (IST)
ठाणे : इमारतीचं बांधकाम सुरु असताना माती खचून 8 ते 10 जण अडकल्याची भीती, पातळीपाडा परिसरातील हिरानंदानी इस्टेटमधील घटना ------------------------------------------------- अहमदनगरला राज्यातील किमान तापमानाची नोंद, नगरमध्ये पारा 5.9 अंशांवर हेडलाईन्स : 1. शिवस्मारकासाठी मच्छिमारांचं मन वळवण्यात मुख्यमंत्र्यांना यश, माती कलशाची भव्य शोभायात्रा, उद्या दिमाखात भूमीपूजन 2. राम मंदिर स्टेशनच्या लोकार्पण कार्यक्रमात शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते भिडले, श्रेयवादावरुन लढाई, रेल्वेमंत्री हतबल 3. पुण्यात आज पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते मेट्रोचं भूमीपूजन, तर उद्या भाजप-राष्ट्रवादी नारळ फोडणार, श्रेयवादाची हीन लढाई 4. मोदींनी खिल्ली उडवण्यापेक्षा प्रश्नांची उत्तरं द्यावी, राहुल गांधींचा घणाघात, नोटाबंदीचा फायदा श्रीमंतांनी उचलल्याचा आरोप 5. आमीरचा बहुप्रतीक्षित दंगल आज प्रेक्षकांच्या भेटीला, स्क्रीनिंगसाठी अवघं तारांगण एकवटलं, उत्सुकता शिगेला 6. रवीचंद्रन अश्विन आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटर आणि सर्वोत्तम कसोटीवीर, आयसीसीच्या वन डे संघाचं नेतृत्त्व विराटच्या हाती