मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना, शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता मेट्रो 3 च्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं गिरगांव परिसरातल्या जुन्या इमारतींवर हातोडा पडणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
गिरगांव परिसरातल्या जुन्या इमारतींवरसंदर्भात येत्या 10 दिवसात योग्य निर्णय घ्या, नाहीतर मेट्रोचं काम बंद पाडण्याचा इशारा शिवसेनेनं दिला.
मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशननुसार गिरगांव, काळबादेवी, चिराबाजार इथल्या 26 इमारती बाधित होणार आहेत. या प्रकरल्पामुळे जवळपास 700 ते 800 कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.
दरम्यान, कुलाबा-वांद्रे-सिप्झ या 33.5 किमी लांबीच्या भुयारी मेट्रो मार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून यासाठी एकूण 70 विदेशी तज्ज्ञांसह 500 जणांची टीम कामाला लागली.