'करुन दाखवलं'ऐवजी शिवसेनेची नवी टॅगलाईन 'डीड यू नो'
एबीपी माझा वेब टीम | 14 Jan 2017 12:48 PM (IST)
मुंबई: महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजताच मुंबईत आता पोस्टरबाजीची सुरुवात झाली आहे. यात महत्वाची गोष्ट म्हणजे ''करुन दाखवलं'' या टॅगलाईनअंतर्गत विकासकामांचा आलेख मांडणाऱ्या शिवसेनेनं आता आपली टॅगलाईन बदलली आहे. त्याऐवजी ''डीड यू नो'' अर्थात तुम्हाला माहिती आहे का, अशी नवी टॅगलाईन सेनेच्या पोस्टरवर झळकताना दिसत आहे. ''करुन दाखवलं'' ही शिवसेनेची टॅगलाईन याआधी बऱ्याच चर्चेत सुद्धा राहिली होती. विरोधकांनीही सेनेवर टीका करताना त्यांच्याच टॅग लाईनचा वापर करुन निशाणा साधला होता. आता शिवसेनेने टॅगलाईन बदलली आहे.