मुंबई: 'दमलेल्या बाबाची कहाणी' या संदीप-सलील यांच्या गीताचा प्रत्यय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत. कारण घर आणि मुलीकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते 'मॅजेस्टीक गप्पा'मध्ये बोलत होते.

मुलगी माझा गृहपाठ घेते.मला विशेष वेळ मिळत नाही. घराकडे, मुलीकडे लक्ष देता येत नाही. मुलगी समजून घेते, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

"मी घरी पोहचतो, तेव्हा ती झोपलेली असते.


मागीलवेळी तीने विचारलं, दुष्काळ संपल्यावर तू बाहेर घेऊन जाशील का?


त्यावर मी हो घेऊन जाईन" असं सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.


मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्याचे अजून कोपरेही मला माहित नाही, अजून घरात फिरायला वेळ मिळाला नाही, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.



रात्री झोपण्याकरिता, जेवायला घरी जातो. दोन वर्षे दुष्काळामुळे वेळ नव्हता. आव्हानं खूप होती. त्यामुळे कामासाठी 24 तासही कमी आहेत, असं फडणवीस म्हणाले.

याशिवाय मुख्यमंत्र्यांनी स्वत:चं शरीर आणि डाएटबाबत यावेळी सांगितलं.

"मी डायट प्रामाणिकपणे डाएट फॉलो करतो.


त्याचा उपयोग झाला.मधून- मधून जमलं तर व्यायाम करतो.


दिनक्रम विस्कळीत असला तरी डाएट मात्र सुरळीत फॉलो करतो", असं मुख्यमंत्री म्हणाले.


आपलं वजन कमी होतं, तेव्हा दुसऱ्यांना शहाणपण शिकवायला येतं, वजन वाढल की मग मी गप्प बसेन, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

अमृताची वेगळी ओळख

पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, "अमृताची वेगळी ओळख आहे. मी माझ्या मनाप्रमाणे वागतो, तिने तिच्या मनाप्रमाणे वागावं असं मला वाटतं. ती मूळची गायिका आहे. रात्री उशिरापर्यंत रियाज करते.  अनेक लोक सांगतात सांभाळून घ्या, मी सांगतो मी माझं काम करतो, ती तिचं करते. मी बायकोच ऐकतो का? तर नाही ऐकत.  मग ती पण वेगळी व्यक्ती आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

"मला सूर,ताल समजत नाही. पण मला हजाराच्या संख्येत गाणी पाठ आहे, पण सुरात गात नाही. गाणं मोठ्याने लावायचं आणि गायचं. पत्नीचा आवज चांगला आहे, पण तिला लिरिक्स माहित नाही. त्यावेळी मी तिला सूचवतो. आम्ही एकत्र गाणी म्हणतो", असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

व्हॅलेंटाईन स्पेशल : मुख्यमंत्र्यांची प्रेमकहाणी
व्हॅलेंटाईन स्पेशल : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची प्रेमकहाणी