कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे लाखो रुपये खर्च करुन काहीच महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेल्या आणि युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेली 'ओपन जिम' चक्क गायब झाली आहे.
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत 30 नोव्हेंबर 2016 रोजी मोठ्या थाटामाटात ओपन जिमचे उद्घाटन करण्यात आले होते. पण आता ही ओपन जिमच गायब झाल्यानं कल्याण-डोंबिवली महापालिकेचा भोंगळ कारभाराचा समोर आला आहे.
कल्याण पश्चिमेच्या वायले नगर परिसरात असणाऱ्या मोकळ्या भूखंडावर ही जिम उभारण्यात आली होती. स्थानिक परिसरातील नागरिकही या ओपन जिमचा मोठा वापर करीत होते. मात्र अचानक ही ओपन जिम गेली कुठे? असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.