मुंबई : अयोध्येत राममंदिराच्या भूमीपूजनाला जाण्यासाठी शिवसेनाला निमंत्रणाची गरज नाही. अयोध्येचा रस्ता शिवसेनेनं तयार केला आहे. तसेच या रस्त्यातील अडथळेही शिवसेनेनं दूर केले आहेत. उद्धव ठाकरे अयोध्येला पूर्वीपासूनच जातात. अयोध्या आणि शिवसेनेचं नातं जुनं आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 5 ऑगस्टला होणाऱ्या राममंदिराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमला जाणार का या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत बोलत होते.


उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते तेव्हाही अयोद्धेला गेले होते आणि मुख्यमंत्री झाल्यावरही अयोद्धेला गेले होते. उद्धव ठाकरे अयोध्येला नेहमी जातात. अयोध्या आणि शिवसेनेचे नातं जुनं असून ते नातं राजकीय नाही. राममंदिराच्या रस्त्यातील अडथळे शिवसेनेनं दूर केलेत. अयोध्या आणि राम जन्मभूमीवर आमची श्रद्धा आहे. हिंदुत्त्व या भावनेतूनच शिवसैनिकांनी बलिदान केलं, असं संजय राऊत यांनी म्हटलं.


राममंदिराचा विषय राम जन्मभूमी न्यास यांच्या ताब्यात असून त्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिलं आहे. अजून किती लोकांना बोलवणार आहेत किंवा राजकीय सोशल डिस्टन्सिंग किती पाळणार आहेत हे लवकर कळेल असंही संजय राऊत यांनी म्हटलं.


संबंधित बातम्या




Sanjay Raut on Ram Mandir | उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार? पाहा संजय राऊत काय म्हणाले