शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सोमय्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
‘किरीट सोमय्या हे आजवर कॉर्पोरेट कंपन्यांना ब्लॅकमेल करत आले आहेत. त्यांनी खुद्द नितीन गडकरींनाही अशाच पद्धतीनं ब्लॅकमेल केलं होतं. पूर्ती घोटाळा त्यांनीच उघड केला होता. पण पुढे याप्रकरणात काहीही तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे अशा पद्धतीनं सोमय्या फक्त आरोप करतात. असा टीका शेवाळेंनी केली.
‘किरीट सोमय्यांचे हे आरोप उद्धव ठाकरेंना बदनाम करण्याचा डाव आहे. केंद्रात यांचं सरकार आहे, राज्यात यांचं सरकार आहे. त्यामुळे त्यांना हवी ती चौकशी त्यांनी करावी. यानंतर सत्य काय ते समोर येईल.’ असंही शेवाळे म्हणाले.
‘सोमय्या हे गेल्या वर्षभरापासून सतत आरोप करत आहे. पण आजवर त्यांनी तक्रार केलेली नाही. सोमय्यांनी सांगत असलेल्या चार कंपन्याशी उद्धव ठाकरेंचा काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षांची सध्याची संपत्ती जाहीर करावी.’ असं आव्हानही शेवाळेंनी सोमय्यांना दिलं.
दरम्यान, या सर्व प्रकरणी आपण किरीट सोमय्यांना कोर्टात खेचणार असल्याचंही शेवाळंनी म्हटलं.
संबंधित बातम्या:
भुजबळ आणि शिवसेना नेत्यांचं एकाच कंपनीत मनी लाँडरिंग: सोमय्या
उद्धव ठाकरेंचे सात कंपन्यांशी आर्थिक लागेबांधे, सोमय्यांचा आरोप
सोमय्यांनी आधी अमित शाहांची संपत्ती जाहीर करावी: राहुल शेवाळे
उद्धव ठाकरेंनी संपूर्ण कुटुंबाच्या संपत्तीचं ऑडिट करावं: सोमय्या