'सामना'वर बंदीची मागणी ही लोकशाहीची हत्या : नवाब मलिक
एबीपी माझा वेब टीम | 16 Feb 2017 04:06 PM (IST)
मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' वृत्तपत्रावर बंदीची मागणी करणाऱ्या भाजपच्या मागणीचा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समाचार घेतला आहे. 'सामना'वर बंदीची मागणी ही लोकशाहीची हत्या असल्याची टीका मलिक यांनी केली आहे. प्रत्येक वर्तमानपत्रात एका कोपऱ्यात भाजपची जाहिरात येते, या जाहिराती कायद्याचं उल्लंघन करत आहेत, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. भाजपच्या जाहिरातबाजीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्षेप असून आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईत भाजप 500 कोटी जाहिरातींवर खर्च करत आहेत, निवडणूक आयोगाने मर्यादा आखल्या असताना भाजप त्यांचं उल्लंघन करत असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. भाजप सरकारकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत त्यामुळे शिवसेनेनं पाठिंबा काढावा, आम्ही कुठल्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही, आम्ही मध्यावधी निवडणुकीला तयार आहोत, असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचवेळी माजी शिवसैनिक मुंबईत काँग्रेस चालवतात, अशी टीकाही त्यांनी केली. भाजपची भूमिका ही आरक्षणविरोधी असून भाजप सरकारच्या काळात कोणत्याही समाजाला आरक्षण मिळणार नाही, अशी टीकाही नवाब मलिक यांनी केली. सामनावरील बंदीबाबत भाजपची मागणी काय?