मुंबई: महागाईविरोधात आक्रमकतेची भूमिका घेत शिवसेना आजापासून रस्त्यावर उतरणार आहे.
पेट्रोल दरवाढीचा भडका उडाला असताना, दिवसेंदिवस होत असलेल्या महागाईला शिवसेनेनं विरोध दर्शवला आहे.
शिवसेना मुंबईत 12 विभागवार मोर्चे काढणारे. आज पहिला मोर्चा हा बोरिवलीत होणार आहे.
दुर्देवानं ही वेळी आमच्यावर आली असून सत्तेत असलो, तरी सत्तेची चावी ज्यांच्या हातात आहे, त्यांनी ही भाववाढ केल्याचं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
सत्तेत असलेल्या शिवसेनेने यापूर्वीही शेतकरी कर्जमाफीवरुन राज्यभरात मोर्चे काढले होते. त्यानंतर आता शिवसेना पेट्रोल दरवाढ आणि महागाईच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे.
संबंधित बातम्या
शिवसेना फुटणार, 20-22 आमदार भाजपत जाणार: रवी राणा
सहा अपक्ष आमदार भाजपच्या संपर्कात?
फडणवीस सरकार राष्ट्रवादीच्याच पाठिंब्यावर सत्तेत: नाना पटोले
हे आहेत नवनिर्वाचित 288 आमदार
राष्ट्रपती निवडणुकीच्या निकालातून शिवसेनेने धडा घ्यावा – रवी राणा