आमदार सदा सरवणकर अडचणीत, शूटिंग करणाऱ्यावर उचललेला हात महिलेला लागला
एबीपी माझा वेब टीम | 15 Jun 2016 02:29 PM (IST)
मुंबई: मुंबईमध्ये शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी एका महिलेवर हात उचलल्याचा प्रकार घडला आहे. ही घटनेची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शिवसेना आमदार सदा सरवणकर वरळीत नागरिकांशी संवाद साधत होते. त्यावेळी एक जण मोबाईलर शूटिंग करत होता. त्याला आक्षेप घेत सदा सरवणकर यांनी त्यांच्या मोबाइलवर हात उचलला. मात्र, तो हात तिथं उपस्थित असलेल्या एका महिलेला लागला. तर आज यवतमाळमध्ये शिवसेनेचा जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शिंदेनं सेंट्रल बँकेच्या कर्मचाऱ्याच्या कानशिलात भडकावल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या दोन्ही घटना शिवसेनेची वाढलेली गुंडगिरी दर्शवतात का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित बातम्या: