मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयाच्या दालनात तातडीची बैठक बोलावली आहे. मंत्रीमंडळात उपस्थित असलेल्या सर्व शिवसेना आमदार आणि मंत्र्यांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सामना दैनिकातून प्रकाशित झालेल्या वादग्रस्त व्यंगचित्रामुळे शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांना रोषाला सामोरं जावं लागत आहे. मंत्रालयासोबतच पक्ष कार्यालय आणि फोनवर संतप्त प्रतिक्रिया मिळत आहेत. त्यामुळे जनतेसमोर काय भूमिका मांडायची, रोषाला सामोरं कसं जायचं आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडण्याबद्दल या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

मंत्रालयात बोलावलेल्या या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सेनेचे मंत्री, आमदार आणि खासदारही उपस्थित राहणार आहेत.