मुंबई: 'आशिष शेलार ज्या 'मातोश्री'च्या आशीर्वादाने ते मोठे झाले ते आता विसरले. दोन वर्ष झाली पण शेलारांना मंत्रीपद मिळालं नाही, त्यामुळे त्यांचा संताप होत आहे. त्यामुळे शेलार आता शिवसेनेला बदनाम करण्याचं काम करत आहेत. पण आम्ही त्यांचं मत गांभीर्यांन घेत नाही.' अशी जोरदार टीका शिवसेना आमदार अनिल परब यांनी शेलारांवर केली आहे.
'निवडणुकीच्या तोंडावर ही सगळी नौटंकी आहे. वर्षपूर्तीनिमित्त सरकारच्या वतीने कुणी पत्रकार परीषद घेत नाही आणि मुंबई भाजप अध्यक्ष महाराष्ट्र सरकारच्या वर्षपूर्तीच्या कारभारावर पत्रकार परिषद घेतात. यांच्यातून दिसून येतं यांच्यात किती ताळमेळ ते दिसून येतं.' असंही परब म्हणाले.
दरम्यान, 'शिवसेनेला भाजपची साथ द्यायची की नाही हे त्यांनी ठरवायचं', असं वक्तव्य मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलं होतं. 'आम्ही तर सेनेला आमच्यासोबत आहे असंच मानतो. आता सेनेचा यात वाटा आहे का हा प्रश्न त्यांनाच विचारला पाहिजे.' असा टोला त्यांनी लगावला होता.