मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याच्या दिवशी राज्यभरात मोठ्या प्रमाणावर सोनंखरेदी करण्यात येते. सोन्याचे दर कितीही असले तरी पाडव्याला आवर्जून सोनं विकत घेण्याची परंपरा यंदाही कायम राहिली आहे.
राज्यातील शहरा-शहरात सर्वच प्रमुख ज्वेलर्समध्ये सोनं खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून आली. दिवाळीच्या या चार दिवसात राज्यभरात 475 कोटी रुपयांच्या सोन्याची विक्री झाल्याची माहिती आहे.
सोन्याचा दर जास्त असूनही अनपेक्षितरित्या झालेल्या या विक्रीनं सोने व्यापारीही आनंदात आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा सोन्याचा दर जास्त असूनही मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. यावरुन यंदा राज्यात शेतीचं उत्पादन चांगलं झालं असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.