मुंबई: विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरचे दर 38 रुपये 50 पैशांनी वाढवण्यात आले आहेत.
मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू करण्यात येणार आहेत. सध्या एका ग्राहकाला वर्षापोटी 9 अनुदानित सिलेंडर मिळतात. त्यामुळं दहावा सिलेंडर विकत घेताना तुम्हाला दरवाढीचे अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.
मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहे. सध्या दिल्लीमध्ये विनाअनुदानित सिलेंडर 529 रुपयाला मिळणार आहे. दरम्यान, याआधीस जुलै महिन्यात विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत घट करण्यात आली होती. तेव्हा 11 रुपये सिलेंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली होती.