मुंबई विमानतळावर 2 कारवायांमध्ये 40 कोटींचं सोनं जप्त
एबीपी माझा वेब टीम | 10 Feb 2017 09:33 AM (IST)
प्रातिनिधिक फोटो
मुंबई: मुंबई विमानतळावर कस्टम विभागाच्या दोन कारवाईत 40 कोटींचं सोनं जप्त करण्यात आलं आहे.या प्रकरणी एकूण चार आरोपींना कस्टम विभागानं ताब्यात घेतलं आहे. मस्कटहून दिल्ली आणि दिल्लीहून मुंबईला आलेल्या विमानातून तीन आरोपींनी प्रत्येकी 10 तोळं सोन्याचे 4 बिस्किटं आणली होती. कस्टमच्या तपासात ही बिस्किटं जप्त करून, आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. तर दुसऱ्या घटनेत कुवैतहून मुंबईमध्ये आलेल्या विमानात 1 किलोचे सोन्याचे दोन तुकडे जप्त करण्यात आले. हे तुकडे स्पीकरमध्ये लपवण्यात आले होते. ज्याची किंमत बाजारात 26 लाख 40 हजार रूपये आहे. याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.