काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 19 आमदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर सभागृहात काय भूमिका घ्यायची, यावर चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 19 आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यावर शिवसेना आमदारांच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश आल्यानंतरच शिवसेनेचे सर्व आमदार मुख्यमंत्र्यांना भेटून 19 आमदारांचं निलंबन मागे घ्या, अशी मागणी करण्याची शक्यता आहे.
सभागृहात गोंधळ घालणे, बॅनर फडकावणे, घोषणाबाजी करणे, अवमान करणे, अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे, सभागृहाची प्रतिमा मलिन करणे, सभागृहाचे अवमान करणे असे आरोप ठेवून 19 आमदारांचं निलंबन करण्यात आलं.
हे आमदार निलंबित
काँग्रेसचे निलंबित आमदार -
- अमर काळे – काँग्रेस, आर्वी मतदारसंघ, वर्धा
- विजय वडेट्टीवार- काँग्रेस, ब्रह्मपुरी, चंद्रपूर
- हर्षवर्धन सकपाळ – काँग्रेस, बुलडाणा
- अब्दुल सत्तार – काँग्रेस, सिल्लोड, औरंगाबाद
- डी.पी. सावंत – काँग्रेस, नांदेड उत्तर
- संग्राम थोपटे – काँग्रेस, भोर, पुणे
- अमित झनक – काँग्रेस, रिसोड, वाशिम
- कुणाल पाटील – काँग्रेस, धुळे ग्रामीण
- जयकुमार गोरे – काँग्रेस, माण – सातारा
राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार -
- भास्कर जाधव – राष्ट्रवादी- गुहागर मतदारसंघ, रत्नागिरी
- जितेंद्र आव्हाड – राष्ट्रवादी, कळवा, ठाणे
- मधुसूदन केंद्रे – राष्ट्रवादी काँग्रेस, गंगाखेड, परभणी
- संग्राम जगताप – राष्ट्रवादी, अहमदनगर
- अवधूत तटकरे – राष्ट्रवादी, श्रीवर्धन, रायगड
- दीपक चव्हाण – राष्ट्रवादी, फलटण – सातारा
- नरहरी जिरवाळ – राष्ट्रवादी काँग्रेस दिंडोरी, नाशिक
- वैभव पिचड- राष्ट्रवादी, अकोले – अहमदनगर
- राहुल जगताप – राष्ट्रवादी काँग्रेस, श्रीगोंदा अहमदनगर
- दत्तात्रय भरणे – राष्ट्रवादी काँग्रेस, इंदापूर, पुणे
संबंधित बातमी
19 आमदारांचं निलंबन : कोण काय म्हणालं?
आमदारांचं निलंबन असंवैधानिक, लोकशाहीचा खून: जयंत पाटील
कर्जमाफीवरुन निलंबन चुकीचं, आमदारांच्या निलंबनाला शिवसेनेचा विरोध
...म्हणून मोजून 19 आमदारांचं निलंबन : पृथ्वीराज चव्हाण
निलंबित आमदारांच्या यादीतून 2 नावं ऐनवेळी वगळली
मतदानाच्या भीतीने 19 आमदारांचं निलंबन?