शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या : अटकेत असलेल्या पत्नीची जेलमध्ये आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 28 Jan 2019 09:12 AM (IST)
साक्षीने आज सकाळच्या सुमारास कारागृहातील मोडकळीस शौचालयामध्ये लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.
कल्याण : शहापूर तालुक्यातील अघई इथल्या शिवसेना पदाधिकारी शैलेश निमसे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली. कल्याणच्या आधारवाडी कारागृहात साक्षी निमसेने आज सकाळी आत्महत्या केली. आत्महत्याचं कारण मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. साक्षीने आज सकाळच्या सुमारास कारागृहातील मोडकळीस शौचालयामध्ये लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वतःच्या पतीच्या हत्येप्रकरणात अटकेत असलेल्या साक्षी निमसेला आपल्या कृत्याबद्दल पश्चाताप होत असल्याने, तिने डिप्रेशनमध्ये आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. दरम्यान, याबाबत नातेवाईकांशी संपर्क साधला असता त्यांनी साक्षीला पश्चाताप होत असल्याचं सांगितलं. हत्येबाबत पश्चाताप होत असून जगावंसं वाटत नसल्याचं साक्षीने म्हटल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.