Mumbai News : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेत (shiv sena) नवा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. कारण मातोश्रीवरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार असल्याचा गौप्यस्फोट नारायण राणेंनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे. राणेंच्या दाव्यानुसार मातोश्रीवरील ज्या चार ज्यांना ईडीची नोटीस प्राप्त होईल, ते कोण असतील? याबद्दल चर्चा सुरू आहे. या नेत्यांबद्दल नारायण राणे स्वतः सांगतील की मग नोटीशी मिळाल्यानंतर त्यांची नावं समोर येतील? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान काल ठाकरेंवर केलेल्या आरोपानंतर नारायण राणे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. सकाळी 11 वाजता ही पत्रकार परिषद होणार असून राणे यावेळी अनेक नवे गौप्यस्फोट करणार असल्याची चर्चा आहे.


नारायण राणे आणि शिवसेनेतला संघर्ष आणखी भडकण्याची चिन्हं आहेत. मातोश्रीवरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला आहे.  सुशांतसिंह प्रकरणाचीही फाईल पुन्हा ओपन होणार असल्याचं नारायण राणे म्हणाले आहेत.






शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वाद हा नेहमीच चर्चेचा असतो. त्यात आता मुंबई महानगरपालिकेनं नारायण राणे यांना त्यांच्या मुंबईतील बंगल्यामध्ये अनधिकृत बांधकामाप्रकरणी नोटीस बजावली होती. त्यांच्या बंगल्याची तपासणी केली जाणार असल्याचं त्या नोटीसमध्ये म्हटलं होतं. ही नोटीस मिळाल्यानंतर नारायण राणे यांनी ट्वीट करत शिवसेना नेत्यांना इशारा दिला आहे. दरम्यान, आता हे शिवसेनेचे चार नेते ज्यांना ईडीची नोटीस प्राप्त होईल, ते कोण असतील, याबद्दल चर्चा सुरू आहेत. या नेत्यांबद्दल नारायण राणे स्वतः सांगतील की मग येत्या काळात त्यांना नोटीशी मिळाल्यानंतर त्यांची नावं समोर येतील, हे पुढच्या काही दिवसांत कळेल.


काही दिवसांपूर्वीच जेव्हा मिलिंद नार्वेकर यांनी नारायण राणेंनी आपल्या मेडिकल कॉलेजच्या मंजुरीसाठी याचना केल्याचा दावा केला होता. तेव्हाही राणेंनी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांच्या फोनवरुन आपल्याला दोनवेळा फोन का केला होता? असा सवाल विचारुन खळबळ उडवून दिली होती.