मुंबई : पारदर्शकतेच्या मुद्द्यावर युती तोडल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा खोटा आहे, असा प्रतिदावा शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केला आहे. मुंबईतील शिवसेना भवन इथल्या पत्रकार परिषदेत अनिल परब बोलत होते.

आगामी महापालिका निवडणुकीत जागांच्या नाही तर पारदर्शकतेच्या मुद्द्यावर शिवसेनेने युती तोडली असा दावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरेगावमधील विजयी संकल्प मेळाव्यात शिवसेनेवर चौफेर टीका केली होती.

भाजपची औकात काय ते 21 तारखेला दाखवू : मुख्यमंत्री


त्याबाबत अनिल परब म्हणाले की, "पारदर्शकता शिवसेनेला नको म्हणून युती तुटली असा आभास मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आला आहे. पण अल्पमतात असलेल्या भाजप सरकारने सभागृहात बहुमत सिद्ध कसं केलं, हे सुद्धा अजून गुलदस्त्यात आहे. त्यात कुठे होती पारदर्शकता? हे सरकारच मुळात पारदर्शक नाही. पारदर्शकता मुंबईसह इतर महापालिकेत आणि राज्यासोबत केंद्रात हवी, अशी आमची मागणी आहे."

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात रस्त्याच्या सिमेंटीकरणात घोटाळा

"नागपूरच्या रस्त्याच्या सिमेंटीकरणात झालेल्या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी मी सातत्याने करत आहे. ज्या कॉन्ट्रॅक्टर्सनी सर्व नियम धाब्यावर बसवले, त्यांच्यावरही अजूनही कारवाई झालेली नाही. तसंच ब्लॅक लिस्टड कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत अद्याप कुठलंच पाऊल उचलेलं नाही. नागपूरकारांना पाणी पुरवठा करणाऱ्यांना OCW चं कंत्राट कोणाचं हे स्पष्ट करा," अशी मागणी आमदार परब यांनी केली.

मुख्यमंत्र्यांच्या घणाघाती भाषणावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया


अनिल परब पुढे म्हणाले की, "नागपूर शहरात 10 टप्प्यात 24 तास पाणीपुरवठा करण्याच्या अटीवर 4 रुपयांचा दर 22 रुपये करण्यात आला. हा जनतेच्या पैशांवर दरोडा आहे. त्यामुळे यांना माफिया म्हणायचं की दरोडेखोर म्हणायचं हा प्रश्न आहे. 4500 कोटींचे रस्ते तयार होणार आहेत, अब्जावधी रुपयांचं सिमेंट लागणार आहे. एका विशिष्ट कंपनीला हे काम दिलेलं आहे. प्रति बॅग हा दर ठरलेला आहे."
नागपूरमध्ये कोट्यवधींचा डांबर घोटाळा

"नागपुरात कोट्यवधींचा डांबर घोटाळा झालेला आहे. 19 ऑगस्ट 2016 रोजी चौकशीची मागणी केली होते. आयुक्तांकडे निवेदन दिलेलं आहे. परंतु मला उत्तर मिळालं नाही. त्यामुळे आयुक्तांवर येत्या अधिवेशनात विशेष हक्क भंग आणणार," असंही अनिल परब म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 25 महत्त्वाचे मुद्दे