मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीदरम्यान कल्याण-डोंबिवलीसाठी जाहीर केलेलं 6 हजार 500 कोटींचं पॅकेज पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण वर्ष उलटूनही या पॅकेजमधील नवा पैसाही उपलब्ध झाला नसल्याचं आता समोर आलं आहे.


आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारातून ही माहिती समोर आणली आहे.

स्वत: कल्याण-डोंबिवली महापालिकेने तशी माहिती दिल्याचं गलगलींनी म्हटलं आहे.

गलगली यांनी या 'पॅकेज'बाबत कल्याण-डोंबिवली महापालिका आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती मागवली होती.

मुख्यमंत्र्यांनी ऑक्टोबर 2015 मध्ये जाहिर केलेल्या 6500 कोटी रुपयांच्या पॅकेजपैकी किती रक्कम मनपाला देण्यात आली, अशी विचारणा गलगली यांनी केली होती.

मुख्यमंत्री कार्यालयाने गलगलींचा अर्ज नगरविकास खात्याकडे आणि नगरविकास खात्याने एमएमआरडीएकडे पाठवला.

केडीएमसी अकाऊंट ऑफिसर आणि जनसंपर्क अधिकारी विनायक कुलकर्णी यांनी गलगलींना त्याबाबतची माहिती दिली. आतापर्यंत कोणताही फंड उपलब्ध झालेला नाही, असं त्यांनी सांगितल्याचं गलगले म्हणाले.

6500 कोटींची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 ऑक्टोबर 2015 रोजी कल्याण-डोंबिवली मनपा निवडणुकीदरम्यान, 6500 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं. भाजपच्या विकास परिषदेत ही घोषणा केली होती.


त्यापूर्वी राज्य सरकारने 27 गावांसाठी 1200 कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केलं होतं.


संबंधित बातम्या

'कल्याण-डोंबिवली स्मार्ट आणि सेफसिटी बनवायचीय', मुख्यमंत्र्यांसह दिग्गज पालिका प्रचारात


पॅकेजवरुन मुख्यमंत्र्यांचं घूमजाव, मनसेचं गाजर आंदोलन


6500 कोटींच्या पॅकेजची घोषणा मुख्यमंत्र्यांच्या अंगलट? निवडणूक आयोग विधान तपासणार