Aaditya Thackeray  on Devendra Fadnavis : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीवरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपकडून सुरू असलेल्या आरोपांवर शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही कोणतेही राजकारण न करता काम असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची कोणत्याही सूडबुद्धीने चौकशी नाही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


मुंबईतील एका कार्यक्रमानंतर आदित्य ठाकरे यांनी  माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी म्हटले की, राज्यातले महाविकास आघाडी सरकार कोणतेही राजकारण न करता काम करत आहोत. आम्ही कोणत्याही यंत्रणेला प्रचार यंत्रणा म्हणून वापरत नाही. केंद्र सरकारकडून तसा वापर केला जातो. पोलीस अथवा न्यायालयीन प्रक्रियेवर मी भाष्य करत नाही. संबंधित यंत्रणा त्यांचे काम करत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. भाजप सध्या नैराश्यमध्ये आहे, त्यातून राज्य सरकारवर आरोप करत असल्याचे त्यांनी म्हटले.


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज पोलिसांकडून त्यांच्याच घरी चौकशी सुरू आहे. त्यांना आधी चौकशीसाठी आज सकाळी 11 वाजता वांद्रे कुर्ला संकुलातील सायबर पोलीस ठाण्यात बोलावलं होतं. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांची चौकशी त्यांच्या शासकीय निवासस्थानी करण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला. आज दुपारी 12 वाजता फडणवीस यांची पोलीस चौकशी सुरू करण्यात आली. 


भाजपचे आंदोलन


पोलीस बदली लीक प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज पोलीस चौकशी करणार आहेत. मुंबई पोलिसांकडून सुरू असलेल्या या चौकशीच्या विरोधात भाजपने राज्यभरात आंदोलन केले. फडणवीस यांची सुरू असलेली चौकशी सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha