Nitesh Rane : महाराष्ट्रात नोटीस मिळणे हे गुड मॉर्निंग मेसेजसारखे झाले आहे. मेसेज येताच नोटीस मिळते असे वक्तव्य भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. सत्य बोलल्यावर एफआयआर नोंदवला जातो किंवा नोटीस पाठवली जाते. बॉम्बस्फोटात असणारा आरोपी दाऊद याविषयी आम्ही आमची भूमिका मांडली आहे. दाऊदवर एवढे प्रेम असेल तर महाराष्ट्र सरकारच्या सर्व मंत्र्यांनी आपल्या केबिनमधून गांधीजींचा फोटो काढून दाऊदचा फोटो लावावा आणि त्याला महाराष्ट्र भूषण द्यावा असेही राणे यावेळी म्हणाले.

Continues below advertisement

आम्ही हिंदू आहोत आणि हिंदुत्वाबद्द आम्ही बोलणारचं, आम्ही कुठेही दंगल भडकावू असे म्हटलेलं नाही असे राणे यावेळी म्हणाले. जरम्यान, पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे, त्यावर देखील नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस वस्तुस्थितीच्या आधारे बोलतात, तरीही त्यांना नोटीस पाठवली आहे, असे नितेश राणे म्हणाले.

देशाच्या सुरक्षेच्या बाजूने बोलणे हा गुन्हा आहे का? असा सवालही राणेंनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांनी गोपनीयतेचा भंग केला नाही. मीडियाला कुठून ते व्हिडिओ मिळाले, ते माहित नाही. सरकर घाबरलेलं आहे, सरकार आगीशी खेळत आहे, ते स्वत: जळून खाक होणार आहे असी टीका देखील राणेंनी केली आहे. 

Continues below advertisement

माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांवर निशाणा साधत त्यांचा संबंध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडला होता. शरद पवार यांचं नाव दाऊद इब्राहिमशी जोडल्या प्रकरणी राणे बंधूंविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

राष्ट्रवादी युवक काँग्रेचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या तक्रारी नंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम मुस्लिम तेढ निर्माण करून दंगल घडतील असं भाष्य केल्याची एफआयआर कॉपीत नोंद केली आहे. एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, नितेश राणे यांनी आझाद मैदानावर बोलताना नवाब मलिक यांचा राजीनामा का घेत नाहीत अशी विचारण शरद पवारांना केली. वास्तविकरित्या राजीनामा घेण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री आणि सरकारचा आहे. पण अनिल देशमुखांचा मराठा म्हणून राजीनामा घेतला पण नवाब मलिक मुस्लिम असल्याकारणाने त्यांचा राजीनामा घेतला नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं होतं. नितेश राणे हे हिंदू-मुस्लिम गटात तेढ, द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं तक्रारीत म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या: