मोदींचा मुंबई दौरा, दोन्ही कार्यक्रमांकडे शिवसेनेची पाठ
एबीपी माझा वेब टीम | 18 Feb 2018 11:28 PM (IST)
मुंबई आणि नवी मुंबईतील दोन्ही कार्यक्रमांकडे शिवसेनेने पाठ फिरवली.
मुंबई : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत कार्यक्रमांचं भूमीपूजन आणि उद्घाटन करत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मात्र या कार्यक्रमांकडे पाठ फिरवली. बीकेसीवरील कार्यक्रमाचं नियोजन शिवसेनेचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या देखरेखीत पार पडत असलं तरी उद्धव ठाकरे मात्र या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. नवी मुंबईत स्थानिक शिवसेना आमदार-खासदारांची नावं निमंत्रण पत्रिकेत नसल्याने भूमीपूजनावर शिवसेनेकडून बहिष्कार टाकण्यात आला. कार्यक्रमादरम्यान मोदींना काळे झेंडे दाखवण्यासाठी उरण, पनवेलमधून आलेल्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुंबईत बीकेसीच्या मैदानावर मॅग्नेटिक महाराष्ट्र-2018 या कार्यक्रमाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूमीपूजन आणि जेएनपीटीच्या चौथ्या टर्मिनलचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आलं. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच स्वबळाचा नारा दिला आहे. त्यानंतर सत्तेत असूनही शिवसेनेने सरकारी योजनांच्या उद्धाटन कार्यक्रमांकडे फिरवलेली पाठ यामुळे दरी आणखीच वाढल्याचं चित्र आहे. संबंधित बातम्या :