मुंबई : कॅबिनेट मंत्री डॉ. दीपक सावंत यांचा पत्ता कट करत ते सध्या आमदार असलेल्या मुंबई पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी शिवसेनेकडून विलास पोतनीस यांना देण्यात आली आहे. विलास पोतनीस हे सध्या बोरीवलीचे विभाग प्रमुख आहेत.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीनंतर मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूकही चुरशीची होण्याची शक्यता आहे. कारण, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणेही या निवडणुकीत एंट्री करणार आहेत. राणेंच्या माध्यमातून भाजप शिवसेनेची कोंडी करण्याची शक्यता आहे.
नारायण राणे सात जून रोजी मुंबईत मेळावा घेत आहेत. पक्ष स्थापनेनंतर मुंबईतला पक्षाचा हा पहिलाच मेळावा आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेत विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचा पराभव केल्यानंतर नारायण राणे आता मुंबईतही शिवसेनेविरोधात दंड थोपटण्याची शक्यता आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम
नाशिक शिक्षक मतदारसंघ, मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ आणि कोकण विभागातून पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ सात जुलै रोजी संपत आहे. यासाठी 25 जून रोजी मतदान होईल, तर 28 जून रोजी निकाल आहे.
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख सात जून आहे, तर अर्ज 11 जूनपर्यंत मागे घेता येणार आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे विद्यामन आमदार
नाशिक शिक्षक मतदारसंघ : डॉ. अपूर्व हिरे
मुंबई शिक्षक मतदारसंघ : कपिल पाटील
मुंबई पदवीधर मतदारसंघ : डॉ. दीपक सावंत
कोकण पदवीधर मतदारसंघ : निरंजन डावखरे
शिवसेनेची मुंबई पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी विलास पोतनीसांना
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Jun 2018 08:35 PM (IST)
मुंबई पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी शिवसेनेकडून विलास पोतनीस यांना देण्यात आली आहे. विलास पोतनीस हे सध्या बोरीवलीचे विभाग प्रमुख आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -