मुंबई : गेल्यावर्षीप्रमाणे यंदाच्या दसरा मेळाव्यावरूनही शिवसेना ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे गट (Eknath Shinde) एकमेकांससमोर आल्याचं चित्र आहे. आपला दसरा मेळावा (Dasara Melava) हा शिवाजी पार्कवरच (Shivaji Park) व्हावा यासाठी दोन्ही गटाकडून महापालिकेला पत्रक देण्यात आले आहेत. पण परंपरेप्रमाणे यंदाही शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार आणि त्यासाठी प्लॅनही तयार असल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात येतंय. 


गेल्या वर्षी शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा ठाकरे गटाकडून घेण्यात आला होता, यंदाही त्या ठिकाणी आम्हच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळण्यासाठी अडचण येणार नाही असा विश्वास ठाकरे गटाचे नेते महेश सावंत यांनी व्यक्त केला आहे. आता महापालिकेला आम्ही पत्र दिलं आहे, त्यांचा निर्णय काय होतो याची वाट पाहू आणि त्यानंतर वरिष्ठ नेते भूमिका घेतील असंही ते म्हणाले. 


शिवाजी पार्कवर यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाकडूनही परवानगी मागितली आहे. गेल्या वर्षीही यावरून वाद झाला होता आणि ठाकरे गटाने न्यायालयाची दारं धडकावली होती. त्यानंतर ठाकरे गटाचा मेळावा हा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा मेळवा हा बीकेसीमध्ये पार पडला होता. आताही दोन्ही गटांनी आपल्यालाच शिवाजी पार्क मिळावं अशी मागणी करत महापालिकेकडे पत्र दिलं आहे. 


शिवाजी पार्क आम्हालाच मिळणार


ठाकरे गटाचे नेते महेश सावंत म्हणाले की, मागच्या वर्षी थाटामाटात आम्ही शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा केला होता. मागच्या वर्षी शेवटपर्यंत मुंबई महापालिकेने आम्हाला शिवाजी पार्कसाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे आम्ही न्यायालयात गेलो. 
मागच्या वर्षीचा न्यायालयाचा निकाल आमच्याकडे आहे. त्याची परवानगी आम्ही या वर्षीच्या पत्रात जोडली आहे दीड महिन्यापूर्वीच आम्ही पत्र मुंबई महापालिकेला दिला आहे. त्यामुळे यावर्षी आम्हाला शिवाजी पार्क दसरा मेळाव्यासाठी मिळण्यासाठी काही अडचण येणार नाही असा विश्वास आहे. 


... शिवाजी पार्क नाकारलं तर, 


महेश सावंत पुढे म्हणाले की, शिंदे गटाने शिवाजी पार्कसाठी पत्र दिलं आहे की नाही याची माहिती नाही. आम्ही वॉर्ड ऑफिसरला आता सुद्धा भेटून आलो. त्यांचा असं म्हणणं आहे की तुमचं पत्र आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आम्ही विधी विभागाला या संदर्भात मार्गदर्शनासाठी पाठवलं आहे. त्यामुळे त्यांचा निर्णय घेईल तोपर्यंत वाट बघू. जर आम्हाला शिवाजी पार्क नाकारलं तर पुढे काय करायचं याचा निर्णय आमची वरिष्ठ नेते घेतील. 


ही बातमी वाचा: