Mumbai Corona Update : मुंबईत (Mumbai) आज 119 नवे कोरोनाबाधित (Corona) आढळले. कालच्या तुलनेत ही रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी असल्याने नागरिकांसह पालिका प्रशासनाला (Mumbai BMC) दिलासा मिळाला आहे. काल 168 नवे कोरोना बाधित आढळले होते. दरम्यान आज 257 जण कोरोनामुक्त देखील झाले असून त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. यासह आज मुंबईत काही दिवसानंतर पहिल्यांदाच एका कोरोनाबाधिताचा (Corona Deaths) मृत्यू झाला आहे.
मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज 119 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 257 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 088 इतकी झाली आहे. आज नव्याने सापडलेल्या 119 रुग्णांपैकी 21 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 249 बेड्सपैकी केवळ 739 बेड वापरात आहेत. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर ही 0.02% टक्के इतका झाला आहे.
रुग्णदुपटीचा दर 4000 पार
मुंबईतील रुग्ण दुपटीच्या दरातही आज लक्षणीय वाढ झाली आहे. काल हा दर 3 हजार 758 दिवसांवर होता. जो आज थेट 4 हजार पार गेला असून 4 हजार 169 इतका मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर आहे.
हे ही वाचा :
- Mumbai Local : लोकल ट्रेन, मॉल्स येथे केवळ लसीकरण पूर्ण झालेल्याच व्यक्तींना प्रवेश देण्याचा निर्णय आता मागे घ्यायला हवा : हायकोर्ट
- महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांना कोरोना; ब्रिटनमध्ये कोरोना निर्बंध हटवण्याबाबत पेच
- Covid Vaccination : भारतात Covishieldसह अनेक लसी सध्या वापरात, तर 'या' पाच लसींची भारताला प्रतिक्षा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha