मुंबई : मुंबई महापौरपदासाठी शिवसेनेकडून जुळवाजुळव सुरू झाली आहे. शिवसेना काँग्रेसच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेनेबाबत काय निर्णय घ्यायचा, यावर सल्ला मसलत करण्यासाठी काँग्रेसचे काही नेते दिल्लीत गेल्याचीही माहिती मिळते आहे. त्यामुळे 8 मार्चला महापौरपदाच्या निवडणुकीत काय नवीन समीकरणं पाहायला मिळतील, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यास काय होईल?

शिवसेना आणि काँग्रेसमधील घडामोडी पाहता, दोन्ही पक्ष मुंबईत एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर मुंबई महापौरपदासाठी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आली, तर स्पष्ट बहुमत मिळू शकेल. कारण शिवसेनेचे 84 नगरसेवक आणि काँग्रेस 31 नगरसेवक मिळून एकूण 115 एवढी संख्या होते.

मात्र, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. येत्या 8 मार्चला महापौरपदाची निवड केली जाणार आहे. त्यामुळे 8 मार्चला संपूर्ण चित्र स्पष्ट होईलच. मात्र, त्याआधी शिवसेना किंवा काँग्रेसकडून एकत्र येण्यासंबंधी काही अधिकृत घोषणा केली जाते का, याकडेही मुंबईकरांसह संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या :


मुंबईच्या महापौरांची निवड ‘अशी’ होईल !

मुंबईच्या महापौरांची निवड 8 मार्चलाच होणार

महापौर निवडणूक आणि आकड्यांचं गणित

मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीतील फोडाफोडीचा इतिहास