कॉ. पानसरे हत्या प्रकरण : ‘सनातन’चे प्रमुख जयंत आठवलेंची SIT कडून चौकशी
एबीपी माझा वेब टीम | 01 Mar 2017 11:59 PM (IST)
पणजी : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवले यांची गोव्यातल्या आश्रमात एसआयटीकडून चौकशी झाली. गोव्यातील आश्रमात जयंत आठवलेंची दोन दिवस कसून चौकशी झाल्याची माहिती मिळते आहे. सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी एसआयटीची टीम चौकशीसाठी आली होती, या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेले दोन दिवस एसआयटीची टीम गोव्यातील आश्रमात होती असं त्यांनी म्हटलं आहे. “दोन दिवस एसआयटीची टीम सनातनच्या गोव्यातील आश्रमात होती. कोणाची चौकशी झाली हे सांगता येणार नाही. कारण प्रकरण न्याप्रविष्ठ आहे.”, असं अभय वर्तक यांनी म्हटले आहे.