5 ते 6 जागांवरुन युतीचं ब्रेक-अप होणार?
एबीपी माझा वेब टीम | 19 Jan 2017 11:15 AM (IST)
मुंबई: विधानसभेप्रमाणेच 5 ते 10 जागांच्या वाटाघाटीवर शिवसेना- भाजप युतीचं ब्रेकअप होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेशी घासाघीस करुन भाजपने 114 जागांची मागणी लावून धरली असली, तरीही भाजप 105 जागांवर समाधानी होण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेना 95 ते 100 च्या आसपास जागा सोडण्यास तयार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.