शिवसेना मंत्र्यांच्या राजीनाम्याची तारीख ठरली?
'माझा विशेष' चर्चेमध्ये बोलताना गिरीश महाजनांनी शिवसेना आणि भाजप यांच्या मलोमिलनाचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत.
शिवसेनेने पाठिंबा काढल्यास 150 आमदार भाजपच्याविरोधात : अजित पवार
निवडणुकीनंतर एकत्र यायचं आहे, त्यामुळे शिवसेनेने तोलून मापून टीका करावी, असं गिरीश महाजन म्हणाले. त्यामुळे निवडणुकीपूर्वीचा काडीमोड दिखाव्यापुरता आहे का अशी शंका उपस्थित झाली आहे.
महाजन म्हणाले की, "निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही एकमेकांवर टीका करतोय. आम्ही सांगितलं आमच्यात मतभेद आहे, मनभेद नाहीत. पण शिवसेनेने पुन्हा भूमिका घेतली की, आमच्यात मनभेदही आहेत आणि मतभेदही. मला वाटतं त्यांनी एवढ्या शेवटच्या टोकाला जाऊ नये. निवडणुका झाल्या की, बऱ्याच वेळा असं झालंय, कल्याण-डोंबिवलीच्यावेळीही राजीनाम्याचा विषय आला होता, राणे साहेबांनीही सांगितलं होतं. पण कुठे काय झालं? तसं काही होत नाही. शेवटी मग एकत्र येतो. पण टीका करताना तोलून मापून केली पाहिजे. नंतर पुन्हा एकत्र येताना ऑकवर्ड व्हायला नको एकमेकांसमोर, ही भूमिका सेनेने घेतली पाहिजे. पाच वर्ष आम्ही सरकारमध्ये राहू, त्या सरकारला कुठलाही धोका नाही."
शिवसेनेच्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची तारीख ठरली?
दरम्यान, खिशात राजीनामा घेऊन फिरणाऱ्या शिवसेना मंत्र्यांच्या राजीनाम्याची तारीख ठरल्याचं सांगण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 18 फेब्रुवारीच्या मुंबईतील सभेत, शिवसेना मंत्री राजीनामे देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंकडे हे राजीनामे सोपवण्याची चिन्हं आहेत.
मुंबई महापालिकेसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपवर दबाव टाकण्यासाठी आणि मतदारांमध्ये संदेश देण्यासाठी शिवसेना ही खेळी करण्याच्या तयारीत आहे.
संबंधित बातम्या
राजीनामे खिशात नाहीत, पण आदेश येताच मंत्रिपद सोडू : शिवतारे
पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या 26 शिवसैनिकांची पक्षातून हकालपट्टी
सात शिवसैनिकांचा अपघाती मृत्यू, उद्धव यांची विलेपार्लेतील सभा रद्द
“राजीनामा खिशात, फक्त पक्षप्रमुखांचा आदेश हवा”
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सेना मंत्र्यांची फौज ‘वर्षा’ बंगल्यावर
पाहा व्हिडीओ