मुंबई : शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली असली तरी भिवंडी लोकसभा मतदार संघात दोन्ही पक्षांमध्ये मतभेद कायम आहेत. भिवंडी लोकसभेची जागा भाजपला दिली तर शिवसेना निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मदत करणार नसल्याचे वातावरण पाहायला मिळत आहे.

भाजप-शिवसेनेच्या युतीनंतरही भिवंडी मतदारसंघात युतीबाबत आजही पेच कायम आहे. भिवंडी लोकसभा मतदार संघात भाजप खासदार कपिल पाटील यांना शिवसेनेकडून टोकाचा विरोध आहे. पालघरची जागा शिवसेनेला देण्यात आली असून भिवंडीची जागा आता भाजपला दिली जाणार असल्याने भिवंडी शिवसेनेत बंडखोरीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहेत

भिवंडी लोकसभेसाठी भाजपचे खासदार कपिल पाटील तर शिवसेनेकडून ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा हे इच्छुक उमेदवार आहेत. भिवंडीची जागा भाजपला दिली तर दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढण्याचा इशारा बाल्या मामा यांनी दिला आहे.