मुंबई : 'लालबागचा राजा' गणपती मंडळावर धर्मादाय आयुक्तांनी घातलेल्या निर्बंधावरून शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. धर्मादाय आयुक्तांनी घेतलेला निर्णय चुकीचा आणि एककल्ली असल्याचा आरोप शिवसेना खासदार राहुल शेवाळेंनी केला आहे.


याउलट लालबागचा राजा मंडळवर निर्बंध घालणाऱ्या आयुक्तांच्याच चौकशीची मागणी राहुल शेवाळेंची केली आहे. मंडळाच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याची भाषा करणाऱ्या धर्मादाय आयुक्तांचा 'बोलविता धनी' नेमका कोण? आहे असा सवालही शेवाळेंचा उपस्थित केला.


हिंदूंच्या सणांना आडकाठी करू नये. भाजप सरकारने चालविलेले हे नसते उद्योग त्वरित थांबवावे, असा इशाराही शेवाळेंनी यावेळी दिला.


लालबागचा राजा गणेश मंडळाच्या पारदर्शक कारभारासाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याच निर्णय धर्मादाय आयुक्तांनी घेतला आहे. नव्याने स्थापन केलेली ही समिती दर्शन रांगेबाबात धोरण ठरवणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची मुजोरी, व्हीव्हीआयपींची अरेरावी आणि त्यामुळे सर्वसामान्य भाविकांची होणार परवड रोखली जाण्याची शक्यता आहे.


लालबागच्या राजाच्या चरणी दान करण्यात येणाऱ्या पैसे, दागिने आणि मौल्यवान गोष्टींची मोजदाद धर्मादाय आयुक्तांच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहे. या दानाची मोजदाद धर्मदाय आयुक्तलयाचा प्रतिनिधीसमोर होणार आहे.


धर्मादाय आयुक्तांनी लालबागचा राजा मंडळाच्या विरोधात आलेल्या तक्रारींची दखल घेत एकंदर परिस्थितीची पाहणी केली आणि काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.


संबंधित बातम्या 

'लालबागचा राजा' मंडळावर सरकारची करडी नजर