राहुल शेवाळे किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीबाबत म्हणाले की, "किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर अनेकदा अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. शिवसैनिक सोमय्या यांनी केलेली टीका विसरलेले नाहीत. त्यामुळे ईशान्य मुंबई मतदार संघात किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे."
दरम्यान दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीचा वाद आता मिटलेला आहे. या मतदार संघासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे दोघेही आग्रही होते. परंतु आठवले यांनी माघार घेतली असून शेवाळेंच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे.