मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सभेला सुरवात झाली आहे.


उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे 




  • जानेवारीपासून मी स्वतः दुष्काळग्रस्त भागात फिरणार : उद्धव ठाकरे

  • राज्यात शिवसेनेची सत्ता आणा उद्धव ठाकरेचं आवाहन

  • देवाधिकांच्या नावांचा जुमले देऊ, नका, ठोकून काढू

  • सरकारच्या नुसत्या घोषणा, पण वास्तवात काहीच नाही

  • शेतकरी कर्जबाजारी आहे, पण तो मल्या किंवा मोदी नाही

  • हे सरकार पुन्हा आणीबाणी आणतय, जनतेच्या वैयक्तिक आयुष्यात घुसखोरी करतंय

  • कांदा राखून ठेवा, ते बेशुद्ध पडले की उपयोगाला येतील

  • निवडणुका आल्या की ह्यांच्या अंगात देव घुमायला लागतो

  • युती करायची की नाही हे जनता ठरवेल

  • पीकविम्यासाठी खासगी कंपन्यांना कंत्राट का?

  • राम मंदिराबाबत नितीश कुमारांनी आपलं मत सांगावं

  • संघमुक्त करायला निघालेल्या नितीश कुमारांच्या मांडीला मांडी लावून भाजप बसत आहे

  • शिवरायांचा महाराष्ट्र तुमची मस्ती सहन करणार नाही

  • शेतकऱ्यांच्या योजना दुप्पट करणाऱ्या योजना कुठं गेल्या? उद्धव ठाकरेंचा सवाल

  • सैन्याची पगारवाढ नाही आणि शास्त्र सामग्रीत घोटाळा करता, किती पापं कराल

  • हल्ली पहारेकरीसुद्धा चोऱ्या करायला लागलाय

  • कुंभकर्णा जागा हो, अन्यथा पेटलेला हिंदू तुला सोडणार नाही

  • 5 राज्याच्या निकालांनी सत्तांध लोकांना हादरा

  • अयोध्येला कुंभकर्णाला जागे करायला गेलो होतो

  • जिथे प्रादेशिक पक्ष मजबूत तिथे राष्ट्रीय पक्षाला धूळ चारलीय

  • बाळासाहेबांचा वारसा पुढे घेऊन जातोय

  • वेगवेगळ्या जातींच्या न्याय हक्कासाठी सोबत लढेल

  • पंढरपूरमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सभा लाईव्ह


उद्धव ठाकरेच्या दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंची महासभा आणि महाआरतीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त पंढरपूरात दाखल झाला आहे. नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये, असं आवाहन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.


LIVE UPDATES




  • उद्धव ठाकरे सहकुटुंब विठुरायाच्या चरणी

  • उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी घेतलं विठ्ठलाचं दर्शन

  • विठ्ठल मंदिर ट्रस्टकडून उद्धव ठाकरे यांना विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट

  • उद्धव ठाकरे सहकुटुंब पंढरपुरात दाखल

  • पत्नी रश्मी ठाकरे, युवासेवा प्रमुख आदित्य ठाकरे सोबत

  • शिवसेनेचे सर्व मंत्री पंढरपुरात उपस्थित


कसा असेल उद्धव ठाकरेंचा पंढरपूर दौरा?


- उद्धव ठाकरे सकाळी 11.15 वाजता मातोश्री निवास्थानाहून कुटुंबासह पंढरपूरला निघतील.


- चार्टर्ड विमानाने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि रामनाथ पंडित दुपारी 12.30 वाजता मुंबई विमानतळावरुन सोलापूरसाठी टेक ऑफ करतील.


- चार्टर्ड विमान सोलापूर विमानतळावर दुपारी दीड वाजता पोहचेल.


- सोलापूर विमानतळावरुन हेलिकॉप्टरने दुपारी 1.45 वाजता पंढरपूरसाठी उड्डाण करेल.


- दुपारी 2.10 वाजता ठाकरे कुटुंबिय पंढरपुरात दाखल होतील.


- पंढरपुरात दाखल झाल्यावर ठाकरे कुटुंबिय शासकीय निवास्थानी जातील.


- शासकीय निवास्थानी वारकरी सांप्रदायातील मान्यवरांच्या भेटी होणार आहेत.


- संध्याकाळी 4 वाजता उद्धव ठाकरे सहकुटुंब विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी पोहोचतील.


- दुपारी 3 वाजात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होईल.


- उद्धव ठाकरे चंद्ररभागा मैदानातील महासभा स्टेजवर संध्याकाळी 4.30 वाजता येतील.


- संध्यकाळा 4.45 वाजता उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई-पंढरपूर 'विठाई' एसटी बस सेवेचा शुभारंभ होईल.


- संध्याकाळी 5 वाजता उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरु होईल.


- संध्याकाळी 6.45 वाजता चंद्रभागा किनारी इस्कॉन घाटावर उद्धव ठाकरे सहकुटुंब महाआरती करतील.