भाजप आणि शिवसेना यांच्यात आज युतीसंदर्भात तिसरी बैठक पार पडली पण या तिसऱ्या बैठकीतून काहीच निष्पन्न झालं नाही. या बैठकीत भाजपकडून देण्यात आलेला 114 जागेंचा प्रस्ताव शिवसेनेनं फेटाळला असून शिवसेनेकडून भाजपला 60 जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यामुळे युतीबाबतच्या तिसरी बैठकीतही तणाव कायम होता. दोन्ही पक्षांनी एकमेकांचा प्रस्ताव नाकारल्यानं आता युती तुटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
या बैठकीनंतर शिवसेना आमदार निलम गोऱ्हे यांनी याबाबत ट्वीटरवरुन आपलं मत व्यक्त केलं. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील तणाव अधिक वाढल्याचं चित्र सध्या दिसत आहे.
दरम्यान, युतीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील.