ठाणे: ठाणे महापालिकेत वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी, यासाठी शिवसेनेनं आंदोलन केलं.
कल्पतरु बिल्डर्सला एक हजार आणि लोढा बिल्डर्सला 800 झाडं तोडण्याची परवानगी देण्यात आली होती. याविरोधात सेनेचे 2 खासदार, 3 आमदारांनी 5 तासांपेक्षा अधिक वेळ ठाणे महापालिकेत आंदोलन केलं.
शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे तर आमदार प्रताप सरनाईक, सुभाष भोईर आणि रवींद्र फाटक यांनी दुपारपासून ठिय्या दिला. मात्र, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण रात्री 8वा पालिकेत हजर झाले. यानंतर मागच्या बैठकीतल्या झाडे तोडण्याच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. या आंदोलनात भाजपकडून कुणीही उपस्थित नव्हतं.