अल्पवयीन मुलीवर ६ जणांचा बलात्कार, तिघांना अटक
एबीपी माझा वेब टीम | 08 Sep 2016 06:25 PM (IST)
भिवंडी: फेसबुकवरुन भिंवडीतल्या एका अल्पवयीन मुलीशी मैत्री करुन मुंबईच्या तरुणीनं तिला एकप्रकारे नरकयातना दिल्या. कारण तिच्यामुळे अल्पवयीन मुलीवर 6 जणांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडितेची फेसबुकवरची मैत्रीण शैलेदाबानो उर्फ सानिया निशाद अहमद शेख, असफाक शेख आणि ईर्शाद अन्सारीला अटक करण्यात आली आहे. तर 4 जण फरार आहेत. सानिया शेखनं पीडित मुलीला विश्वासात घेऊन मुंबईत फिरण्यासाठी बोलावलं आणि मुलीला नराधमांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर अल्पवयीन मुलीने नराधमांच्या तावडीतून सुटका करुन थेट भिवंडी गाठलं. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शांतीनगर पोलिसांनी या तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तिघा आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.