मुंबई: बाप्पाच्या आगमनानंतर वेध लागतात ते गौराईचे. आज राज्यभरात मोठ्या थाटामाटात गौरी आणल्या गेल्या.
पुण्यातल्या वानवरीत राहणाऱ्या बागुल कुटुबीयांकडे गेल्या सव्वाशे वर्षांपासून गौराईचं माहेरपण केलं जाते. यंदा गौराई स्थापनेतून त्यांनी महिला संरक्षण आणि बेटी बचाओ, बेटी बढाओचा संदेश दिला आहे.
तर विदर्भात हा महालक्ष्मीचा सण म्हणून मोठ्या आनंदात साजरा करण्यात येतो. काहींच्या घरी दीड दिवस तर काहींच्या घरी दोन दिवस मुक्काम करणाऱ्या महालक्ष्मी म्हणजे समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक मानलं जातं.