Uddhav Thackeray : भायखळा (Byculla) येथील दोन शिवसैनिकांवर गुरुवारी रात्री हल्ला झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांची तक्रारही घेतली नाही. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी दुपारी भायखळामध्ये जाऊन त्या शिवसैनिकांची विचारपूस केली. तसेच जीवाशी येत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा यावेळी त्यांनी दिला. शुक्रवारी शिवसेना भवनावरील बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भायखळा येथील रामभाऊ भोगले मार्गावर असलेल्या 208 नंबरच्या शाखेला भेट दिली. यावेळी त्यांनी शिवसैनिकांची विचारपूस केली. भायखळा येथील शिवसेना पदाधिकारी बबन गावकर आणि विजय कामतेकर यांच्या गाडीवर काही जणांनी गुरुवारी रात्री हल्ला केला होता. 

Continues below advertisement

संरक्षण का नाही दिलं? असा जाब उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना विचारला. यावेळी पोलिसांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'शिवसैनिकांना रक्त न सांडण्याचं मी आवाहन करतोय. मात्र असं होत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही. जीवाशी येत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही. कारवाई झाली पाहिजे. तुम्ही तात्काळ कारवाई करा. आरोपींना तुम्ही चौकशीसाठी का बोलवलं नाही? 'असं राजकारण कधीच झालं नव्हतं. तुम्ही राजकारणात पडू नका, असेही उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना सांगितलं. भायखाळा येथील शिवसेना शाखेला भेट दिल्यानंतर बोलत होते.  शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागता कामा नये, असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला. दरम्यान, भायखळा पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही, असं शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं.   

Continues below advertisement

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भायखळा येथील 208 नंबरच्या शाखेला भेट दिली. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. येथील शिवसेना पदाधिकारी बबन गावकर आणि विजय कामतेकर यांच्या गाडीवर काही जणांनी गुरुवारी रात्री हल्ला केला होता. उद्धव ठाकरे यांनी या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची विचारपूस केली.