Girish Mahajan : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी  जागतिक पुरस्कार विजेते रणजितसिंह  डिसले गुरुजींना (Ranjitsinh  Disale Guruji) भेटण्यासाठी बोलावलं आहे. भाजपचे आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी डिसले गुरुजींना याबाबत फोन केला होता. डिसले गुरुजींनी चांगले काम केले आहे.  त्यांची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली आहे. त्यांना मोठा पुरस्कार मिळाला आहे. डिसले गुरुजींच्या संदर्भात मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असल्याची माहिती गिरीष महाजन यांनी दिली. डिसले गुरुजी उद्या देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे महाजन म्हणाले.


डिसले गुरुजींना राजीनामा मागे घेण्याच्या संदर्भात सांगू


डिसले गुरुजींचे म्हणणे एकूण घेण्यासाठी त्यांना आपण बोलावले पाहिजे, असे मी देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याचे महाजन म्हणाले. एवढा मोठा पुरस्कार मिळालेले गुरुजी आहेत. त्यांच्या व्यथा देखील समजून घेतल्या पाहिजेत असे महाजन म्हणाले. उद्या फडणवीस यांची डिसले गुरुज भेट घेणार आहेत. त्यानंतर देवेंद्र फडणवीस याबाबत सर्व माहिती घेतील. याबाबत आम्ही त्यांना राजीनामा मागे घेण्याच्या संदर्भात सांगू असेही महाजन म्हणाले. एवढा मोठा पुसस्कार मिळालेल्या माणसाचा गाजावाजा सगळ्या जगभर झाला आहे. त्यांनी राजीनामा द्यावा आणि निघून जाव हे योग्य नसल्याचे महाजन म्हणाले.


फडणवीस हा प्रश्न नक्कीच मार्गी लावतील


या प्रकरणाबाबत आम्ही दोघांचेही म्हणणे एकूण घेऊ. मात्र, अशा प्रकारे गुरुजींनी राजीनामा देण योग्य होणार नाही. त्यातून नक्कीच आम्ही मार्ग काढू असेही महाजन यावेळी म्हणाले. डिसले गुरुजी सेवेतच राहतील. पुन्हा त्यांनी प्रोत्साहन कसं देता येईल हा विचार देखील आपण करु असे महाजन म्हणाले. यासंदर्भात सर्व प्रकारची माहिती देवेंद्र फडणवीस मागवतील. आता सरकार आमचे आले आहे. त्यामुळं याबाबत मी लगेच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचे महाजन म्हणाले. पण मला खात्री आहे की फडणवीस हा प्रश्न नक्कीच मार्गी लावतील असे त्यांनी सांगितले.


 जागतिक पुरस्कार विजेते सोलापूरचे शिक्षक रणजीत डिसले यांनी राजीनामा दिला आहे. 6 जुलै रोजी रणजितसिंह डिसले यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्यासंदर्भातील पत्र शिक्षण विभागाकडे दिले आहे. त्यानंतर  आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नावलौकिक करणाऱ्या शिक्षकाला शासनाची नोकरी का सोडावी वाटली हा या निमित्ताने उपस्थित झालेला प्रश्न आहे. डिसले यांच्या राजीनाम्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. 


महत्वाच्या बातम्या: